कोण होईल पंतप्रधान ? दोन महिन्यांच्या भारत प्रवासानंतर राजदीप सरदेसाई यांची ही १० भाकितं

Update: 2019-05-16 04:26 GMT

दोन महिन्यांच्या भारत प्रवासानंतर राजदीप सरदेसाई यांची ही १० भाकितं

१) भाजपा सगळ्यात मोठा पक्ष २८२ पासून लांब

२) एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचेल तरी बहुमतापासून लांब राहिल

३) एनडीए ला २०-२५ जागा कमी पडतील. बहुमतापासून लांब राहिलेल्या एनडीए ला नवीन पटनाइक आणि जगन रेड्डी यांचं बाहेरून समर्थन मिळू शकेल. ओडिशा चक्रीवादळानंतर नवीन पटनायक यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तर आंध्र ला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून जगन रेड्डी ही सरकारला पाठींबा देऊ शकतात.

४) २०१४ च्या तुलनेत काँग्रेस चांगली कामगिरी करेल. काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा तीन आकडी संख्या पार करण्यात काँग्रेसला खूप अडथळे आहेत. हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसला जम बसवता आला नाही तसंच देशभर आघाड्या करण्यात अपयश मिळालं. काँग्रेस आपल्या पुनरागमनाच्या प्रक्रीयेत परत आली आहे.

५) स्थानिक पक्ष चांगली कामगिरी करतील, खास करून दक्षिणेकडे. मात्र तिसरी आघाडी, फेडरल फ्रंट किंवा अशाच स्वरूपाचा प्रयोग यशस्वी होणार नाही. केंद्राच्या सरकारच्या निर्मितीवर फार प्रभाव टाकू शकणार नाहीत.

६) राष्ट्रपती रामनाथ कोविंद सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नरेंद्र मोदी यांनाच सत्तास्थापनेसाठी बोलवतील. निवडणूकपूर्व आघाड्या लक्षात घेता नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान बनण्याची संधी मिळू शकते.

७) पूर्वेकडच्या राज्यांमधून भाजपाला फायदा होऊ शकतो. बंगाल आणि ओडीसा मध्ये फायदा होताना दिसतो.

८) उत्तरप्रदेश मध्ये भाजपाला दोन आकडी नुकसान होताना दिसतंय. महागठबंधन फायदा होताना दिसतंय. काँग्रेसला कदाचित मध्यप्रदेश वगळता दोन आकडी जागा कुठेच मिळताना दिसत नाहीयत.

९) कर्नाटक सोडून दक्षिणेकडे फार चांगली कामगिरी करताना दिसत नाही. केरळमध्ये काँग्रेसला फायदा होईल, तर डीएमके सोबत आघाडीमुळे तामिळनाडूत त्यांना फायदा होताना दिसतो.

१०) उत्तरप्रदेश-बंगाल यांचा प्रभाव नवीन सरकारवर राहिल. या दोन राज्याचं नेमकं काय होईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. मायावती-अखिलेश आणि ममता बॅनर्जी यांनी कडवी झुंज दिली आहे.

Similar News