वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा दबदबा कायम राहणार..

Update: 2020-01-08 13:25 GMT

वाशिम जिल्हा परिषदेचे सर्वच्या सर्व म्हणजे ५२ जागांचे निकाल घोषित झाले आहे. या निकालात महाविकास आघाडी जिल्हा परिषदेवरची सत्ता राखणार असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या २० वर्षापासून वाशिम जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र या निवडणूकीत काँग्रेसच्या जागा १७ वरुन ९ पर्यंत आल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या आहेत. भाजपचे उमेदवार केवळ ७ जागांवर विजयी झालेत.

या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत ८ जागा मिळवल्या आहेत. तर काँग्रेसचे बंडखोर नेते माजी राज्यमंत्री अनंत देशमुख यांच्या जनविकास आघाडीला ६ जागांवर विजय मिळवता आलाय. राष्ट्रवादी १२ + काँग्रेस ९ + शिवसेना ६, हे तिन्ही पक्ष एकत्र येवून जिल्हा परिषदेची सत्ता राखणार असल्याचं स्पष्ट आहे.

दूसरिकडे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी प्रचारासाठी परिश्रम घेतले, मात्र त्याचा भाजपला काही फायदा झाला नसल्याचं स्पष्ट झालंय. वाशिमचे रिसोड, मालेगाव हे दोन तालुके धोत्रे यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडतात. मात्र या दोन्ही तालुक्यात भाजपला केवळ एक जिल्हा परिषदेची जागा जिंकता आली आहे.

वाशिम जिल्हा परिषद

एकूण जागा -५२

भाजपा -०७

काँग्रेस -०९

शिवसेना -०७

राष्ट्रवादी -१२

वंचित बहुजन आघाडी-०८

जनविकास आघाडी-०६

अपक्ष-०२

स्वाभिमानी शेतकरी संघटना -०१

Full View

Similar News