पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात एका प्रेस कॉन्फरन्सला हजेरी लावली. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली नाही. यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.
लोक जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी त्यांच्यासारखा घाबरट नव्हतो. मी कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळून जात नव्हतो. अशा शब्दात डॉ. मनमोहन सिंह यांनी मोदींचा समाचार घेतला.
पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळून जाणारा मी पंतप्रधान नव्हे. पत्रकारांशी मी सतत संवाद साधत होतो. प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर मी दौऱयाविषयी माहिती देत असे.