बंदर के हात में वस्तरा नहीं दिया जाता, भाजपा नेत्याची केजरीवालांवर खालच्या पातळीवर टीका

Update: 2019-04-04 04:50 GMT

दिल्ली ला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. पूर्ण राज्याचा मुद्दा यंदा निवडणूकीचा मुख्य मुद्दा करण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे. पूर्ण राज्याबाबत भाजपा दुतोंडी भूमिका घेत असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी सध्या चालवली आहे.

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी प्रथम त्यांना समर्थन देत असलेल्या मित्रपक्षांचं समर्थन तरी मिळवून दाखवावं असं मत भाजपाचे नेते विजय गोयल यांनी व्यक्त केलं होतं. केजरीवाल यांच्या मित्रपक्षांपैकी एकानेही पूर्ण राज्याचा मुद्दा कधी उचललेला नाही, असं ट्वीट विजय गोयल यांनी केलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात केजरीवाल यांनी ही अटल बिहारी वाजपेयी यांचीच इच्छा होती.

अटलजींनी दिल्ली ला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून संसदेत बिल आणलं होतं. भाजपा अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थि देशभरात फिरवून मतं मागत आहे, पण त्यांचं स्वप्न मात्र पूर्ण करू इच्छित नाही अशी टीका केजरीवाल यांनी केली होती.

यावर बंदर के हात उस्तरा नहीं दिया जाता असं ट्वीट विजय गोयल यांनी केलं आहे.

पूर्ण राज्याच्या दर्जा बाबत आमचा पक्ष किती गंभीर आहे, हे तुम्हीच आता सांगीतलंय, पण एकही पार्टी अशा मुख्यमंत्र्याला समर्थन देणार नाही तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्यासाठी प्रसिद्ध आहे, असंही गोयल यांनी म्हटलंय.

Similar News