दोन महिला नक्षलींचा खात्मा

Update: 2019-04-27 13:49 GMT

पोलीस अभियानावर भूसुरूंग स्फोट घडवून हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. भामरागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जंगलात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू आहे.

रामको नरोटी आणि शिल्पा ध्रुवा या दोन महिला नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या मतदानाआधी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची रामको नरोटी ही सूत्रधार होती. रामकोवर १२ खुनांसह ४५ गुन्हे दाखल आहेत. रामकोवर १२ लाखांचं बक्षिसही ठेवण्यात आलं होतं. रामको ही नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीची सदस्यही होती.

Similar News