Shiv Sena and NCP Symbol Dispute : शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी आज खरचं होणार का?
Supreme Court Hearing गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षाचे मूळ नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह कोणाकडे राहील, याबाबतच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच यावेळी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यावरही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी महानगरपालिकेच्या निकालाच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले असताना ही सुनावणी आजचं होईल का? किंवा पुन्हा पुढची तारीख दिली जाईल? यावर ॲड. असीम सरोदे यांनी एक्सवर भाष्य केलं आहे.
काय म्हणताहेत ॲड. असीम सरोदे?
सर्वोच्च न्यायालायने आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच).
परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगा बाबत च्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालायने आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि… pic.twitter.com/A2O0LZ4cSz
— Asim Sarode (@AsimSarode) January 21, 2026
दरम्यान, असीम सरोदे यांनी २० जानेवारी २०२६ला एक्सवर पोस्ट करत ही सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना यांचं नेमकं काय होणार यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे ॲड. असीम सरोदे यांनी
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न - जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील.सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न - जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये…
— Asim Sarode (@AsimSarode) January 20, २०२६
असीम सरोदे यांच्या पोस्टला शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांनी 37 नंबरचे मॅटर कधी बोर्डावरच येणार नाही..! आपण भाबडा आशावाद सोडूया... आणि ताकदीने लढू या... म्हटलं आहे.
37 नंबरचे मॅटर कधी बोर्डावरच येणार नाही..!
— SushmaTai Andhare (@andharesushama) January 20, 2026
आपण भाबडा आशावाद सोडूया... आणि ताकदीने लढू या... https://t.co/mjXlgefPv8