मुंबई गारठली, पुढील दोन ते तीन दिवस गारठा जाणवणार

Update: 2022-01-24 03:23 GMT

सध्या वातावरणाचे चक्र बिघडलेले असताना अवकाळी पावसानंतर मुंबईसह परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील काही भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस झाल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे. एरवी कधीही न गाठणारी मुंबई देखील यंदा चांगलीच गारठली आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये तापमान 16 अंशांपर्यंत खाली आले आहे. थंडीचे हे प्रमाण पुढचे एक ते दोन दिवस कायम राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश भागातही थंडी वाढली आहे. पुणे, नाशिकसब काही भागात कमाल तांपना 25 अंशाखाली नोंदवले गेले आहे. राज्यातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवस थंडीचा परिणाम जाणवेल असे सांगितले जात आहे. राज्यात पुढील काही दिवसात अवकाळी पाऊस आणि त्यानंतर थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्याप्रमाणे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

मुंबईत थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी स्वेटर घातल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. तसेच एरवी लोकलच्या दरवाजामध्ये उभे राहिलेले लोकांचे चित्र सोमवारी सकाळी दिसले नाही. तर बहुतांश प्रवाशांनी लोकलच्या खिडक्याही बंद ठेवल्याचे दिसत होते. पावसाळ्यातही खूप कमीवेळा लोकलची खिडकी बंद ठेवणाऱ्या प्रवाशांना बोचऱ्या थंडीमुळे खिडक्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत.

दुसरीकडे हवेताली धूलिकणांमुळे रविवारी मुंबईच्या अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक म्हणून नोंदवला गेला. हवेत मोठय़ा प्रमाणावर धूलिकण असल्याने दृश्यमानता देखील कमी नोंदवली गेली. त्यामुळेच तापमानातही घट झाली असून गेल्या १० वर्षातील किमान तापमानाची नोंद मुंबईत रविवारी ढाली.

Similar News