IBN7 या न्यूज चॅनेलचा विश्वासू ड्राव्हर अन्वरचा लिव्हर कॅन्सरशी लढा, उपचारांसाठी मदतीचे आवाहन
Mumbai मुंबईतील Media मीडिया क्षेत्रात ‘अन्वर हटेला’ या नावानं ओळखला जाणारा अन्वर सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. IBN7 या न्यूज चॅनेलच्या टीमसोबत दीर्घकाळ ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या अन्वरने अनेक कठीण परिस्थितींमध्ये रिपोर्टर्स आणि टीमला वेळेवर पोहोचवून मोठी साथ दिली आहे. धोकादायक परिस्थितीतही धैर्याने वाहन चालवत अन्वरने असंख्य कव्हरेज आणि चेस मोहिमा यशस्वी केल्या. त्यामुळेच तो टीममधील सर्वांत विश्वासू आणि तत्पर ड्रायव्हर मानला जातो.
परंतु सध्या अन्वरच्या आयुष्याची गाडी रुळावरून घसरली आहे. त्याला liver cancer लिव्हर कॅन्सरचे निदान झाले असून उपचारांसाठी दर महिन्याला सुमारे १५ ते २५ हजार रुपयांच्या औषधांची गरज भासते. आजारामुळे तो काम करू शकत नसल्याने गेल्या पाच महिन्यांचे घरभाडेही थकले आहे. काही सामाजिक संस्थांकडून आणि परिचितांकडून वेळोवेळी मदत मिळाली असली तरी ती अपुरी पडत आहे. विशेषतः दर महिन्याला सातत्याने मिळणारी आर्थिक मदत नसल्याने त्याच्या उपचारांवर परिणाम होण्याची भीती आहे.
अन्वरला मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी त्याच्या कुटुंबीयांकडून क्यूआर कोडद्वारे देणगीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच थेट अन्वरशीही संपर्क साधता येऊ शकतो. त्याचा संपर्क क्रमांक आहे - +91 70214 93940.
मानवतेच्या आधारावर अन्वरच्या उपचारांसाठी पुढाकार घेण्याचे आणि मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन.