आदिवासी बांधवांच्या संघर्षला यश, खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द

Update: 2020-12-19 10:02 GMT

पालघर : खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून संपूर्ण ४००० रू. रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने खावटी योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २००० रूपये रोखीने त्यांचा बँक खात्यात व २००० रूपयाची मदत अन्नधान्याच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले होते.

पण या योजनेच्या अंमलबावणीतील दिरंगाई व अनियमिततेमुळे तसेच लाभार्थ्यांचे स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करा आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात संपूर्ण ४००० रू. रक्कम जमा (DBT) करण्याची मागणी श्राजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी केली होती. याबाबत विवेक पंडित यांनी राज्यपाल भागात सिह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, यांच भेट घेतली होती. तसंच आदिवासी बांधवांन या संदर्भात काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते.

Tags:    

Similar News