Monsoon Update : खुशखबर अखेर मान्सून भारतात दाखल

Update: 2022-05-29 06:53 GMT

एकीकडे वाढत्या तापमानाने सर्वजण वैतागलेले असताना आता थोडे चिंब करणारी बातमी....उन्हाच्या झळा असह्य झालेल्या असताना सगळ्यांना प्रतिक्षा असते ती पावसाची....मान्सून कधी एकदा भारतात दाखल होतो आणि त्या जीवघेण्या उकाड्यापासून सुटका करतो, याची प्रतिक्षा प्रत्येकाला असते. याच पार्श्वभूमीवर आता एक आनंदाची बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ज्याची प्रतिक्षा होती तो मान्सून अखेर भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन काही वेळापूर्वी झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

दरवर्षी मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होत असतो. पण यंदा तीन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ बरोबरच तामिळनाडूच्या काही भाग देखील मान्सूनने व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एवढेच नाही तर सध्याची हवामानाची स्थिती मान्सूनचा पुढील प्रवास व्यवस्थित होऊ शकेल अशी असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागातही मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Full View
Tags:    

Similar News