जतंर-मंतर घोषणाबाजी भोवली :भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह सहा जणांना अटक

दिल्लीतील जंतर-मंतरवरील मुस्लिम समाजाविरोधातील घोषणाबाजी आता भाजप नेत्यांच्या अंगलट आली असून भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह सहा जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Update: 2021-08-10 07:29 GMT

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मुस्लिम विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार रविवारी घडला होता. याच मोर्चादरम्यान नॅशनल दस्तकचे पत्रकार अनुभव प्रितम यांच्यावरही जयश्रीराम घोषणा देण्याची सक्ती केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर याची चर्चा झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी कारवाईची मागणी केली होती.

दिल्ली पोलिसांनी अटक केल्यामधे भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्या सोबतच विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह हे सेव्ह इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत, याच संस्थेच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी जंतर -मंतर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

घोषणा देणाऱ्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीसांकडून अजूनही शोध सुरु आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ आणि १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.दिल्लीच्या जंतर -मंतरवर आंदोलनादरम्यान लोकांनी जातीय घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला होता, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भारत जोडो आंदोलनाच्या वतीने जंतर -मंतरवर निदर्शने करण्यात आली होती.भारत जोडो आंदोलनाचे मीडिया प्रभारी शिप्रा श्रीवास्तव यांनी सांगितले की, आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी केले.

मात्र, त्यांनी जातीय घोषणा देणाऱ्यांशी कोणताही संबंध नाकारला आहे.अश्विनी उपाध्याय यांनी व्डिओची सत्यता तपासून सत्य असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल तर कारवाई करावी. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही भारत छोडो दिन साजरा करण्यासाठी, इंग्रजी कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो."

नॅशनल दस्तकचे पत्रकार अनुभव प्रितम म्हणाले, घोषणा देणाऱ्यांमधे बारावीच्या वर्गातील विद्यार्थी होते. स्थानिक नेत्यांनी फूस लावून या नेत्यांनी आणले असावे.नॅशनल दस्तकच्या पत्रकाराला धमकावल्याप्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रितम यांनी सांगितले.

Tags:    

Similar News