शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट

Update: 2019-11-04 05:31 GMT

सत्ता स्थापनेचं चित्र अजुन स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी होताना आपल्याला दिसतायत. शरद पवार काल दिल्लीत दाखल झाले होते आणि आज पवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. राजकीय वर्तुळात या भेटींच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, हे दोन्हीही कॉेंग्रेसला पडलेलं कोडं आहे.

भारतात बॅकांच्या साडेतीन हजार शाखांना टाळे!

राज्यात पुन्हा निवडणूका होतील – जयकुमार रावल

या अगोदर देखील महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या सद्यस्थितीची चर्चा केली आहे. इतर नेत्यांच्या मतांपेक्षा शरद पवारांच्या मताला सोनिया गांधी अधिक महत्व देतात. म्हणून या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सेनेला पाठिंबा देणार की नाही याबाबत भुमिका स्पष्ट होणार आहे.

Similar News