भाजपच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन

Update: 2019-10-15 14:38 GMT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपचा जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रकाशीत करण्यात आला. या जाहीरनाम्यात विनायक दामोधर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे.

विशेष म्हणजे समाजातील एका वर्गाकडून याचा विरोध देखील केला जात आहे. भाजपने सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्याचं आश्वासन दिल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, भाजपने प्रकाशीत केलेल्या जाहीरनाम्यात एक कोटी रोजगारांसह दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अशा घोषणा या जाहीरनाम्यात देण्यात आल्या आहेत.

वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, महिला, शेती विकास, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्राम विकास, रेल्वे विकास, शेती सुविधा, रस्ते विकास अशा विविध बाबींचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश आहे.

Similar News