सातारा -मुंबई रोडवरील नवीन कात्रज बोगदा राहणार बंद

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे. त्यातच आता सातारा मुंबई महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा बंद राहणार आहे. त्याविषयी NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी माहिती दिली आहे.

Update: 2023-03-18 03:16 GMT

जगातील सातव्या क्रमांकाचे कोंडीचे शहर असलेल्या पुणे (Pune) शहरात सध्या विकासकामांना वेग आला आहे. त्यातच सातारा-मुंबई रस्त्यावरील नवीन कात्रज बोगदा (New Katraj Tunnel) 18 मार्च रोजी सकाळी 11 ते 19 मार्च रोजी दुपारी 2 पर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर हा बोगदा 23 मार्च रोजी सकाळी 11 पासून ते 24 मार्च रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam) यांनी माहिती दिली.

VMS system (Variavle Message sign) आणि VSD ( Vehical Sensor Data) या यंत्रणा बसवल्यानंतर सातारा ते मुंबई नवीन कात्रज बोगद्यातून वाहतून पुन्हा सुरु होईल. त्यामुळे जनतेने विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन संजय कदम यांनी केले. (Where to divert traffic of Satara Mumbai Road)

काय असणार वाहतूकीचा मार्ग?

या रस्त्यावरील वाहतूक यावेळी जुना कात्रज बोगदा मार्ग, कात्रज चौक (Katraj Chauk), नवले पूल (Navle pool), विश्वास हॉटेल येथून मुंबईच्या दिशेने सेवा रोडकडे वळवली जाईल. मुंबई ते सातारा अशी नेहमीची वाहतूक सुरू राहणार आहे.

Tags:    

Similar News