Lata Mangeshkar : स्मारकाचा वाद, राजकारणासाठी शिवाजी पार्कचा बळी नको- मनसे

Update: 2022-02-08 07:23 GMT

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर स्मारकारुन राजकारण सुरु झालं. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्याची मागणी केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र स्मारकाचे राजकारण नको, अशी भूमिका मांडली आहे.

पण या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली आहे. आता या मुद्द्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही भूमिका मांडली आहे. मनसेचे सरचिटणीस असलेले संदीप देशपांडे यांनी राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी घेऊ नका अशी विनंती केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेकवेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती".

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नाहक राजकारण करू नका, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याआधीच व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News