Saamana Editorial : मुंबईचा लिलाव होऊ नये म्हणून मराठी माणसा, उचल ती अस्मितेची भवानी तलवार !

Update: 2025-12-17 04:37 GMT

तब्बल साडेसात वर्षांनी राज्यातल्या municipal corporations २९ महानगरपालिकांच्या निवडणूका होत आहेत. Mumbai मुंबईसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. मराठी माणसांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान निवडणुकीला सामोरं जाण्याआधी शिवसेनाचे मुखपत्र mouthpiece of the Shiv Sena असलेल्या Saamana Editorial सामना अग्रलेखातून मराठी माणसांना आवाहन करण्यात आलं आहे. तसेच राज्यातल्या सत्ताधाऱ्यांची तुलना Dhurendhar धुरंधर चित्रपटातील रेहमान डैकत याच्याशी करत राज्यातल्या महापालिकांमध्ये रेहमान डैकत टोळी घूसून जनतेच्या पैशांची लूट करत आहे असं म्हटलं आहे.




राज्यात आचारसंहिता लागू झाली, पण ही आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी असेल. सत्ताधारी पक्षाचे लोक, त्यांचे मंत्री रोज आचारसंहितेचे उल्लंघन करतात, नियम आणि कायदा मोडतात व मनमानी करतात. राज्याचा किंवा देशाचा निवडणूक आयोग त्यांच्या या कायदेभंगाकडे ढुंकून पाहत नाही. कारण निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनले आहे. अशी टीका Election Commission निवडणूक आयोगावर करण्यात आली आहे.




तर दुसरीकडे मतदार याद्यातील घोळ असताना देखील या निवडणूका होत आहे. खरंतर मतदार यादीतील घोटाळे दूर केल्याशिवाय निवडणुका घेणं लोकशाहीविरोधी आहे. असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला तेव्हा निवडणुक आयोगाने फक्त टोलवाटोलवी केली. राज्यात १५ लाखांवर दुबार मतदार असून मुंबई महानगरपालिकेतच दीड लाखावर दुबार मतदार आहेत. ही बाब गंभीर आहे असे निवडणूक आयोगास वाटत नसेल तर त्याच्या गळ्यात सरकारने गुलामी आणि लाचारीचा पट्टा बांधला आहे. हे मान्य करावे लागेल.




निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून पैशांची उधळण कशी होते? निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपाच्या पैशांच्या थैल्या पकडून दिल्या तरी निवडणूक आयोग ढिम्मचं राहिला. आदर्श निवडणूक आयोग आणि त्याची आदर्श आचारसंहिता म्हणायची म्हणजे सगळा खेळखंडोबा असेच म्हणावे लागेल.

अशा विषम वातावरणात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. २९ महानगरपालिकांत आदर्श पद्धतीने निवडणुका व्हाव्यात यासाठी जनतेनं सावधान राहायला हवे. Mumbai मुंबईसारखे राजधानीचे शहर, जे १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राला मिळाले. मराठी माणसाने त्यासाठी रक्ताचे शिंपण केले, तुरुंगवास भोगला त्या मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पाडण्यासाठी, मुंबईचा लिलाव पुकारण्यासाठी सत्ताधारी यी निवडणुकीत साम, दाम, दंड,भेद वापरतील. तरीह मराठी जनांनी आत्मविश्वास न गमावता जय भवानी जय शिवाजीचा गजर करीत मैदानात उतरायला हवे. असं आज सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. 

Similar News