15 ऑगस्टच्या आधी या देशात येणार कोरोनावरील लस

Update: 2020-08-08 02:02 GMT

संपूर्ण जगभरात कोरोनावरील विविध लसींची चाचणी सुरू असताना रशियाने यामध्ये आघाडी घेतली आहे. रशियामध्ये कोरोनावरील पहिल्या लसीची नोंदणी 12 ऑगस्ट रोजी केली जाणार असल्याची माहिती रशियाचे आरोग्य राज्यमंत्री ओलेग ग्रिडनेव्ह यांनी दिली आहे. ही लस रशियामधील गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियाच्या संरक्षण विभागाने संयुक्तरित्या बनवली आहे.

“गेमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस बनवली असून त्याची नोंदणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. सध्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या असून ही लस सुरक्षित आहे की नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना आधी ही लस देण्यात येणार आहे,” अशी माहिती ग्रिडनेव्ह यांनी दिली आहे.

हे ही वाचा...

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के

western Maharashtra as heavy rains: कोल्हापुरमध्ये पुराचा धोका, लोकांना सुरक्षित स्थळी हलवले…

जेव्हा समूह प्रतिकारशक्ती वाढेल तेव्हा या लसीचा नेमका किती परिणाम होतो हे समजू शकणार आहे, असंही ग्रिडनेव्ह यांनी म्हटले आहे. या लसीच्या मानवी चाचणीला 18 जून रोजी सुरूवात झाली होती. यात 38 जणांना ही लस देण्यात आली. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली वाढल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली आहे. यातील पहिल्या गटाला 15 जुलै रोजी तर दुसऱ्या गटाला 20 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Similar News