Home > News Update > केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
X

केरळमध्ये कोझिकोड विमानतळावर Air India च्या IX 1344 या विमानाला झालेल्या अपघातामधील मृतांची संख्या आता 17 झाली आहे. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. पण विमानातील चारही क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. एअर इंडियाने प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

या विमानात 190 प्रवासी होते. वंदे भारत योजनेअंतर्तग दुबईहून हे सर्व प्रवासी भारतात परत येण्यासाठी निघाले होते. दरम्यान एअर इंडियाने विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना अधिक माहिती मिळावी यासाठी 1800222271 या टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. 190 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान रनवेवर घसरल्याने हा भीषण अपघात झाला. रात्री ८ च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं.

हे ही वाचा...

खासगी रुग्णालयांवर भरारी पथकांचा वॉच

महाराष्ट्राबाहेरुन मुंबईत येणाऱ्यांसाठी महापालिकेचा सक्तीचा नियम

Air India Plane Crash: केरळला येणाऱ्या विमानाला मोठा अपघात, विमानाचे दोन तुकडे

दरम्यान बचावकार्य रात्रीच पूर्ण झाले असून जखमी प्रवाशांना ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दोन पथकं अपघाताच्या चौकशीसाठी रवाना झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.

हेल्पलाईन क्रमांक

Air India Control Room (Kozhikode) - 0091 483 2710189.

Helpline (Kozhikode) - 0091 495 2376901.

Malappuram Collectorate : 0091 483 2736320.

Updated : 8 Aug 2020 1:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top