रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीत घरवापसी

Update: 2019-10-16 13:02 GMT

बुलडाणा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षांतर सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तुपकर यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत याच्या रयत क्रांती या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, तेच रविकांत तुपकर आता एक महिन्याच्या आत स्वगृही परतणार आहेत.

रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. कोल्हापुरात रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Similar News