राहुल गांधींच्या टी शर्टचा वाद, काँग्रेसची बॅनरबाजी

Update: 2022-09-12 06:03 GMT

भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra)दरम्यान राहुल गांधी ( rahul gandhi  ) यांनी घातलेल्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपने  (BJP)   टीका केली आहे, ४१ हजारांचा टी शर्ट घालणारे राहुल गांधी असे म्हणत भाजपने टीका केली होती. पण यावरुन काँग्रेसनेच आता भाजपचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)  कल्याण-डोंबिवली परिसरात दौऱ्यावर असताना कल्याणमध्ये काँग्रेसने मोठमोठे बॅनर लावले आहेत.

"पंतप्रधान मोदींचा १० लाखांचा सूट चालतो, अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बरबरिचा टी शर्ट चालतो मात्र राहुल गांधीचा टी शर्ट डोळ्यात खुपतो, स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून" अशा प्रकारचे बॅनर लावत टीका केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा तीन दिवसाचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे. या दौऱ्याची सुरवात डोंबिवलीमधून झाली. सोमवारी ते कल्याण पूर्व भागात आहेत मात्र कल्याणमध्ये येण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्ता आक्रमक झाले आहेत. ठाकूर यांच्या दौऱ्या अगोदरच केंद्र सरकारच्या निषेधाचे चौकाचौकात बॅनर लावण्यात आले आहेत.

Tags:    

Similar News