बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य

Update: 2022-07-24 07:22 GMT

देशात निवडणूकानंतर सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जातो. त्यापार्श्वभुमीवर आगामी काळातील निवडणूका शिक्का मारूनच घ्यायला हव्यात, अशी मागणी करत प्रणिती शिंदे यांनी बटणावरील मतदानाने सगळं गणित बिघडल्याचं वक्तव्य केलं आहे.

आगामी निवडणुकीत 'ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन् हातावर मारा शिक्का' असं आवाहन सोलापुरातील मतदारांना आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. तसेच सध्या तरी कुठलीही निवडणूक नाही. मात्र येणाऱ्या निवडणूकांमध्ये आता शिक्काच असायला हवा. बटणावरील मतदानाने सगळे बिघडलंय, असा टोला लगावत आमदार प्रणिती शिंदे यांनी EVM च्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उभ केल आहे.सो लापुरातील बापूजी नगरमध्ये युवक काँग्रेसच्या शाखा उदघाटनाच्या वेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या.


Full View

Tags:    

Similar News