मुंबईत ‘नोटा’ ला १ लाखांपेक्षा अधिक मतदान
Over 1 lakh votes cast for NOTA in Mumbai
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. नागरिकांमधील असंतोष स्पष्टपणे दिसुन आला. जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी आपली सत्ता कायम राखली असली तरी मतदारांची नाराजी NOTA (None of The Above) च्या माध्यमातून दिसली.
२०२६ च्या मुंबई (BMC) च्या निवडणुकीत मतदान झालेल्या ५४.६४ लाख मतांपैकी १ लाखांहुन अधिक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला जो एकुण मतदानाच्या जवळपास १.८ टक्के इतका होता. किमान आठ प्रभागांमध्ये नोटा मतांची संख्या विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त होती. म्हणजेच ही मते विरोधी उमेदवारांना मिळाली असती तर कदाचित निकाल बदलू शकला असता.
मुलुंडच्या प्रभाग क्रमांक १०६ मध्ये भाजपचे प्रभाकर शिंदे हे मनसेचे सत्यवान दळवी यांच्याकडून अवघ्या १६४ मतांनी पराभूत झाले, तर त्या प्रभागात ६१० मतदारांनी ‘नोटा’ ला मतदान केलं. प्रभाग १९१ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विशाखा राऊत यांनी १९७ मतांनी विजय मिळवला, मात्र ७७२ मतदारांनी नोटा निवडले. कालिना येथे ट्युलिप मिरांडा यांनी केवळ सात मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर तेथे २६९ मतं ‘नोटा’ ला पडली.
थेट लढत झालेल्या किमान तीन इतर प्रभागांत १००० हून अधिक नोटा मते नोंदवली गेली आहेत
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही असंच चित्र दिसून आलं. येथे २०१५ मध्ये केवळ ५३९१ नोटा मते पडली होती, ती संख्या वाढून यावेळी ७३,५५९ वर पोहोचली. नेरुळमध्ये सर्वाधिक २३९८ नोटा मते नोंदवली गेली, तर बेलापूरमध्ये सर्वात कमी १८९ नोटा मते पडली.