जनतेच्या आनंदातच आमचा आनंद; मनोज जरांगेच्या वडिलांची प्रतिक्रीया

Update: 2024-01-27 11:20 GMT

आंतरवली सराटी: राज्यभर गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाच्या आंदोलनाचा लढा मराठा आंदोलक मनोच जरांगे पाटीन यांच्या नेतृत्वात चालू होता. अखेर आज त्या लढ्याला यश प्राप्त झाले असून राज्यभर आनंदोत्सव साजरा केला जातोय. या जनतेच्या आनंदातच आमचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांच्या वडीलांनी आंतरवली सराटी येथून दिली आहे.


दरम्यान ही विजयाची याञा मुंबई येथून आंतरावली सराटी या आपल्या मातभूमीत लवकरच दाखल होईल. या विजयी याञेचे मोठ्या आनंदोत्सव आणि जल्लोषात स्वागत करुन या ७० वर्षाच्या निरंतर लढयाला यशप्राप्ती झाली या उत्सवात संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे पाटील यांच्या कुटूंबीयांनी दिली आहे. 

Tags:    

Similar News