उ. प्रदेशात हादरवून टाकणारा प्रकार उघड, कैलाश सत्यार्थी यांची स्वतंत्र चौकशीची मागणी

Update: 2020-07-09 03:43 GMT

उत्तर प्रदेशातल्या चित्रकूटमध्ये काही अल्पवयीन आदिवासी मुलींना जबरदस्तीने देहविक्रीच्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इंडिया टुडे टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार चित्रकूटमधल्या खाणींमध्ये या अल्पवयीन मुलींना काम करण्यासाठी जावे लागते. मात्र त्यांना रोजंदारीचे पैसे मिळवण्यासाठी इथले कंत्राटदार आणि मुकादम यांच्याकडून शारिरक छळ सहन करावा लागत आहे. पण आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी या मुलींना हे करावे लागते.

या मुलींच्या पालकांनाही याची माहिती असली तरी आमच्या पुढे जगण्य़ासाठी दुसरा पर्याय नाही असे त्यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान या वृत्ताची दखल नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी घेतली असून, “अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि त्यांना देहविक्री करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे वृत्त अत्यंत लज्जास्पद आहे.

कोणत्याही सुसंस्कृत समाजात असे प्रकार घडता कामा नये. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत.”

हे ही वाचा..

दरम्यान हे वृत्त प्रसारीत होताच चित्रकूटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून असा प्रकारच घडला नसल्याचं चौकशीतून समोर आल्याचे म्हटले आहे. गावात जाऊन संबंधित मुली आणि त्यांच्या पालकांची भेट घेतली. आपल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती या मुली आणि त्यांच्या पालकांनी दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी एसडीएमच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

Similar News