मोदींचं हे देवदर्शन आहे की, फोटो शुट?

Update: 2019-05-19 03:19 GMT

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या दौऱ्यावर रवाना झाले. तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष अमित शाह सोमनाथ मंदीराच्या दर्शनाला गेले आहेत. मोदी केदारनाथला पोहोचल्यानंतर त्यांचे रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. हिमालयाच्या गुफेत राहिलेल्या माणसाला रेड कार्पेटची गरज काय? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोदींचे या पूर्ण दौऱ्याचं ज्या पद्धतीनं चित्रीकरण करण्यात आलं आहे. याचा विचार करता मोदींचा हा पूर्ण दौरा इवेन्ट करण्यात आला होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित गेले जात आहेत.

कारण लोकसभा निवडणुकीनंतर मोदी केदरानाथ जवळील एका गुहेमध्ये ध्यान करणार असं सांगितलं होते. मात्र, हे ध्यान करण्यासाठी कॅमेराची काय गरज होती? विशेष म्हणजे मोदी जेव्हा अभिषेक करत होते. तेव्हा देखील देवाच्या गाभाऱ्यात कॅमेरामॅन असल्याचं चित्रीकरण्यात दिसून येत आहे. त्यामुळे पारंपरिक गढवाली पोशाख परिधान करुन मोदी देव दर्शनासाठी गेले होते की, फोटो शुटसाठी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहेत.

केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी परिसरात सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले आहेत.

Similar News