खासदार संभाजीराजेंना भेटणार का? उदयनराजे म्हणाले

Update: 2021-06-11 08:40 GMT

गेल्या दोन दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज स्वतः उदयनराजे यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे.

या गोष्टीचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये. येत्या 3 ते 4 दिवसात आमची भेट होईल व आम्ही विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली आहे.

Full View

Tags:    

Similar News