ईडीच्या गैरवापराच्या आरोपांवर मोदींचे प्रत्युत्तर, म्हणाले असं काही...

पाच राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. तर देशात एकदाच निवडणूक घ्या असा सल्लाही विरोधकांना दिला.

Update: 2022-02-10 04:41 GMT

देशात पाच राज्यात निवडणूकांची धामधूम सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी भाजपकडून ईडीचा गैरवापर सुरू असल्याच्या आरोप विरोधक करतात असा प्रश्न विचारला. तर त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार देशाला एखाद्या वाळवीप्रमाणे पोखरत आहे. मग अशा वेळी पंतप्रधान म्हणून मी काही केले नाही, तर जनता मला माफ करेल का? सरकारला कोणी माहिती दिली तर त्यावर कारवाई करायला नको का? याऊलट अशा प्रकारामध्ये माझं कौतूक व्हायला हवं, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.

निवडणूकांवेळीच विरोधकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर मोदी म्हणाले की, आपल्या देशात नेहमीच निवडणूका सुरु असतात. तर ईडी, सीबीआय त्यांच्या वेळापत्रकानुसार कारवाई करतात. मात्र त्यांच्या मध्ये निवडणूका येतात त्याला काय करणार? तसेच निवडणूकांवेळी विरोधकांना टार्गेट केले जात नाही. मात्र विरोधकांना तसे वाटत असेल तर पाच वर्षात एकदाच देशातील निवडणूका घ्या की, असेही मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले.

पाच राज्यातील निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पुर्वसंधेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतीतून काँग्रेसवर केलेली टीका उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांच्या निवडणूकीवर प्रभाव टाकू शकते.

Tags:    

Similar News