आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार- विश्वजीत कदम

Update: 2021-09-19 05:27 GMT

सोलापूर : सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे सूचक विधान काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलं आहे. सोलापुरातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलताना कदम यांनी हे विधान करून शिंदे समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

यावेळी बोलताना कदम म्हणाले की , 'आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रीमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील.' असं कदम म्हणाले आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांना मोठा राजकीय वारसा आहे, त्यांना जनताही निवडून देते, मात्र काँग्रेस पक्षाने त्यांना एकदाही त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रणिती शिंदे अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी आहेत, त्यांचा दांडगा लोकसंपर्क असून त्या अतिशय आक्रमक आणि तेवढ्याच मनमिळावू स्वभाव असल्याचे कदम यांनी म्हटले. आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे मात्र, मंत्री म्हणून सिद्ध करण्याची संधी त्यांना अद्याप मिळालेली नाही.

मोदींची लाटेतही त्या निवडून आल्या. प्रणिती यांना ग्लॅमरस राजकारणी म्हणूनही ओळखलं जातं. प्रणिती यांच्यावर बालपणापासून राजकारणाचे संस्कार झाले. आता कदम यांच्या या वक्तव्यानंतर राजकिय चर्चांना उधान आलं आहे.

Tags:    

Similar News