Miss Kerala स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या मॉडेलचा अपघातात मृत्यू

Update: 2021-11-02 03:50 GMT

केरळमधील कोच्ची येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघांची मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

समोरून येणाऱ्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे समजते. या भीषण अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुअनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये ब्यूटी क्वीन असणाऱ्या दोन तरुणींचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला.

फोर्ड फिगो कारमध्ये असणाऱ्या इतर दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, तर दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनसी आणि अंजना या दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News