#कोरोनाशी_लढा- गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार मंत्र्यांचा इशारा

Update: 2020-06-19 01:58 GMT

लॉकडाऊन हळूहळू शिथिल करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारतर्फे नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. पण शहरांमधील काही गृहनिर्माण संस्था अनावश्यक निर्बंध लादत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तरी गृह निर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात त्यांच्या घरी स्वयपाक करण्यासाठी बाहेरील महिला येतात त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच दूध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांना आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गृह निर्माण सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ अनावश्यकपणे निर्बंध घालत आहे.

हे ही वाचा..

परप्रांतीय कामगारांची वापसी सुरु!

पुणे विभागात परदेशातून 1 हजार 667 व्यक्तीचं आगमन, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक प्रवासी

कोरोना ने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली!

तरी राज्यातील सर्व गृह निर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Similar News