Home > News Update > कोरोना ने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली!

कोरोना ने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली!

कोरोना ने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली!
X

वाशिम: कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी रेड झोनमधून जिल्ह्यात परतलेले सर्व नागरिक, जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रासह इतर भागातील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या.

कोरोना विषाणू संसर्ग रोखाण्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १८ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करा. तसेच त्यांना शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

ज्यांची प्रसूती जवळ आलेली आहे, अशा गरोदर महिलांची कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने तपासणी करावी. विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातील गरोदर महिला, अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर, जिल्हा कोविड रुग्णालयातील उपलब्ध सोयी-सुविधा, औषधे व साहित्यांची उपलब्धता, मनुष्यबळ तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विविध योजनांतर्गत करण्यात येत असलेल्या अन्नधान्य वितरणाचा सिंह यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच संचारबंदी काळात पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचीही माहिती घेतली.

हे ही वाचा

राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी सरकार कशी पूर्ण करणार?

कोरोनाच्या संदर्भातील माहिती दररोज अपडेट करा: डॉ. दीपक म्हैसेकर

जिल्हाधिकारी मोडक यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना याविषयी माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, आरोग्य तपासणी याविषयी माहिती दिली.

Updated : 18 Jun 2020 7:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top