राज्यात निवडणूका म्हटलं की काही मतदारसंघ नेहमीच लोकांच्या राजकीय चर्चेचे विषय असतात. त्यामध्ये बीड, बारामती या मतदारसंघात काय काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. सध्या बारामती मतदारसंघात उन्हाबरोबरच राजकारण चांगलंच तापलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. तसंच बारामती लोकसभा मतदारसंघ आगामी पाच वर्षात टँकरमुक्त होण्यासाठी, भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असं आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना चॅलेंज केले...
‘निवडणुका आल्या की विरोधक येतात, बारामतीत भाषणबाजी करतात. पण बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करते,' 'विरोधक आमच्यावर टीका करतात आणि निघून जातात. पुन्हा पाच वर्षे ते फिरकतच नाहीत. नुसती भाषणं करणं फार सोप असतं. या भागात विविध विकास कामं केली आहेत. बारामतीबद्दल या सर्व नेत्यांना प्रेम होतं तर एकाने तरी बारामतीचा दुष्काळी दौरा केलाय का,'