जामनेर मतदारसंघ : गिरिश महाजन यांचा विजय

Update: 2019-10-24 07:33 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मतदारसंघ असलेल्या जामनेर मतदार संघात यंदा काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले होते. कारण या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन सहाव्यांदा मैदानात उतरले होते.

१९९५ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गिरिश महाजन यांच्याकडे सध्या राज्याचे जलसंपदा खातं आहे. तसंच त्यांच्याकडं जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्री पग देखील आहे. त्यामुळं त्यांच्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

त्यातच एकनाथराव खडसेंची राजकीय कारकीर्द संपवण्यामागेही त्यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळं गिरिश महाजन यांचं मताधिक्य घटणार की वाढणार? इतक्या वर्षापासून या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत असल्यानं यावेळी पुन्हा निवडून येणार का अशी चर्चा सुरु असताना गिरिश महाजन जामनेर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय गरुड यांचा पराभव केला.

Similar News