ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला, घडाळ्याने वाचवले

Update: 2019-10-16 13:31 GMT

आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार आहेत. ते महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी पाटोळे या गावात गेले असता त्यांच्यावर एका तरुणानं हल्ला केला.

प्रचारा दरम्यान एका तरुणानं त्यांना नमस्कार केला आणि उजवा हात हातात घेत त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचा वार केला ही बाब ओमराजे यांच्या लक्षात आल्यानंतर ओमराजे यांनी त्यांचा डावा हात पोटाच्या दिशेने नेला त्यामुळे चाकूचा वार पोटाला न लागता हाताच्या घड्याळ्यावर झाला, त्यामुळे आपण वाचलो असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय ओमराजे यांनी ‘मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे .माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने जखम खोल नाही. शिवसेना, भाजपा आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाना विनंती आहे की, शांतता राखावी. आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे, प्रचाराचे थोडेच दिवस शिल्लक आहेत, अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही.

आपलाच - ओमराजे निंबाळकर

Similar News