कबाल चहल यांनी स्वीकारली मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं

Update: 2020-05-09 01:06 GMT

कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारने काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची नगर विकास विभागाचे अपर मुख्‍य सचिव य़ा पदावर बदली केली. परदेशी यांच्या जागी इकबाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्‍यानुसार चहल यांनी शुक्रवारी तातडीनं पालिका महानगरपालिकेच्या आयुक्‍तपदाचा कार्यभार स्वीकारला.

कोण आहेत इकबाल चहल?

1.नगर विकास विभागाचे प्रधान सचिव

2.जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदाचाही अतिरिक्‍त कार्यभार

3.इलेक्‍ट्रॉनिक्‍स एण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग विषयात पदवी

4.१९८९ मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल

5.भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा अनुभव

हे ही वाचा...


दिलासादायक – देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 29.36 टक्के

चहल यांनी आतापर्यंत कुठे कुठे काम केले आहे?

1.नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी

2.औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त

3.औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी

4.ठाण्याचे जिल्‍हाधिकारी

5.पर्यावरण विभागाचे सहसचिव

6.धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी

7.म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी

8.राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त

9.वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव

10.२०१३ ते २०१६ - केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव

Similar News