खळबळजनक बातमी : मंत्रालयातील शिक्षण विभागात पैशांची चोरी...!

Update: 2024-04-23 07:36 GMT

मंत्रालयातील बँकेतून शालेय शिक्षण विभागाचे पैसे चोरीला गेल्याची धक्काधायक बातमी पुढे आली आहे. ज्यामध्ये राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर करून चार टप्प्यात तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयांची रक्कम काढल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरील घटनेमुळे प्रशासकीय विभाग चांगलाच हादरला आहे. याप्रकरणी मरीन ड्रईव्हच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.

मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले हे पैसे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झिनत खातून या व्यक्तिंच्या खात्यावर जमा झाल्याचे देखील तपासात पुढे आले आहे. परंतु हे चारही नावे कोणाची आहेत? यामागे नेमका कोणाचा हात आहे? याची माहिती अजून पुढे आलेली नाही. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस अधिकाऱी अधिक तपास करत आहेत.

मंत्रालयातील बँकेतच असे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरंतर, अशा प्रकारे शासकीय खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी सुध्दा पर्यटन विभागाच्या खात्यातून अशा प्रकारे चोरी करण्यात आली होती. त्यावेळी पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख रुपये चोरीला गेले होते.

तसं पाहिलं तर, मंत्रालयात कोणत्याही व्यक्तीला सहजा-सहजी प्रवेश मिळत नाही. सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जाते. एवढी सुरक्षित यंत्रणा यंत्रणा असताना देखील मंत्रालयात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात सर्व माहिती असणाऱ्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकरणात कुणाकुणाचे हात आहेत, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Tags:    

Similar News