दिलासादायक – देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 29.36 टक्के

Courtesy: Social Media

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या शुक्रवारी 56 हजार 342 झाली आहे. एका दिवसात कोरोनाचे 3 हजार 390 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांच्या संख्येने 56 हजारांचा आकडा पार केला आहे. तर आतापर्यंत 1886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 16 हजार 539 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण आता 29.36 टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. आता देशभरात सध्या कोरोनाचे 39 हजार 916 रुग्ण एक्टिव्ह आहेत म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा…


सर्वपक्षीय बैठक: कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का?

पालघर मॉब लिचिंगप्रकरणी आतापर्यंतची मोठी कारवाई

BMC commissioner transferred: मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली…

Maharashtra MLC Polls: निष्ठावंतांचा पत्ता कट! मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळे यांना तिकिट नाहीच…

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेली दिलासादायक माहिती

• देशातील 216 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही
• 42 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळलेला नाही
• 29 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसात एकही नवीन कोरोना रुग्ण नाही
• 36 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण नाही
• 46 जिल्ह्यांमध्ये 7 दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण नाही
• गेल्या 24 तासात 1273 रुग्ण कोरोनामुक्त