Top
Home > Max Political > BMC commissioner transferred: मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली...

BMC commissioner transferred: मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली...

BMC commissioner transferred: मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली...
X

मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईत वाढलेले रुग्णामुळे ही बदली करण्यात आली आहे. असं त्यांच्या बदलीचं कारण सांगितलं जात असलं तरी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर त्यांची बदली केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोरोना ची संख्या वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागेवर इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील.

अलिकडे अधिकारी लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत. अशा तक्रारी वारंवार येत आहेत. खासकरुन राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याबाबत अनेक मंत्री तक्रारी करत आहेत. त्यातच आज मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता परदेशी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी काम करतील.

Updated : 8 May 2020 1:11 PM GMT
Next Story
Share it
Top