भारतातील कोरोनाचा नवीन स्ट्रेन जगासाठी धोक्याची घंटा- WHO

ब्रिटन, द आफ्रिका आणि ब्राझीलमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने जगाची चिंता वाढवली होती. पण आता भारतातील कोरोनाचा नवीन स्ट्रेन जगासाठी किती धोकादायक आहे याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

Update: 2021-05-11 08:04 GMT

भारतात कोरोनाच्या रुग्णांची आणि बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेने जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. भारतातील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा वेगाने पसरणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचा भारतातील B.1.617 हा व्हेरायन्ट डबल म्युटंट स्ट्रेन म्हणून ओळखला जातो. हा स्ट्रेन भारतात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये आढळला होता. पण आता या स्ट्रेनमध्ये विषाणूनचे दोन व्हरायन्ट असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

हा नवीन स्ट्रेन जगभरातील 30 देशांमध्ये आधीच पसरला आहे, अशी माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भारतात सध्या कोरोनाच्या प्रचंड रुग्णवाढीला आणि कोरोनी बळींच्या वाढत्या संख्येला हाच नवीन स्ट्रेन जबाबदार आहे का, यावर सध्या अभ्यास सुरू असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. दरम्यान सध्याच्या लसींचा वापर या स्ट्रेनवरही उपयुक्त आहे असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे सांगत सौम्या स्वामिनाथन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. B1.617 हा नवीन स्ट्रेन लवकर पसरणारा आहे, त्यामुळे हा विषाणू चिंताजनक गटात मोडतो असे आपण म्हटले होते. पण सध्याची निदान पद्धती, उपचार पद्धती आणि लसीकरण यांचा या विषाणूवर परिणाम होतो की नाही याच्याबद्दलची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना सातत्याने अभ्यास करत असून वेळोवेळी याबद्दलची माहिती प्रसारीत करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News