LIVE: पाचव्या टप्प्यासाठी ७ राज्यांत मतदानाला सुरुवात, अमेठी, रायबरेली कडे देशाचे लक्ष

Update: 2019-05-06 03:31 GMT

लोकसभा निवडणूक 2019 मधील पाचव्या टप्प्यातीलल मतदानाला आज सुरुवात झाली आहे. पाचवा टप्प्यातील मतदानामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष

राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी, जयंत सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. देशात आज 7 राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

कोणत्या राज्यात किती जागेवर मतदान?

उत्तर प्रदेश 14

सीतापूर, धौरहरा, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, बहराइच, कैसरगंज, गोंडा, मोहनलालगंज, अमेठी, रायबरेली, लखनौ, फिरोजाबाद

मध्य प्रदेश 7

दमोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद, बैतुल, टीकमगढ

बिहार 5

मधुबनी, सारन, सीतामढी, मुझफ्फरपूर, हाजीपूर

राजस्थान 13

गंगानगर, चुरू, झुंझुनु, सीकर, अलवर, भरतपूर, करौली, जयपूर, जयपूर ग्रामीण, बिकानेर, दौसा, नागौर,

झारखंड 4

हजारीबाग, खुंटी, कोडरमा, रांची

जम्मू-काश्मीऱ 2

लडाख, अनंतनाग (केवळ शोपियां जिल्ह्यामध्येच)

पश्चिम बंगाल 7

श्रीरामपूर, बंगाव, उलुबेरिया, आरामबाग, हुगली, बैरकपूर, हावडा

Similar News