राज्यात मान्सून दाखल झाला नसला तरी निसर्ग चक्रीवादळानंतर दोन दिवसांनी मुंबई आणि ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार वारे वाहत असून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी सकाळी पावसला सुरूवात झाली आहे.
हे ही वाचा…
कोरोनावरील लसीचे २० लाख डोस तयार : ट्रम्प
लॉकडाऊन नंतरचे ऑनलाइन शालेय शिक्षण
ठाण्यातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळतो आहे. दरम्यान मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असून देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईला पाणीपुरवठा करत असलेल्या ७ धरणांमधील पाणी साठा वाढला आहे.