औंध परिसरात गोळीबार, एक गंभीर जखमी तर आरोपीची आत्महत्या

गोळीबारात आकाश जाधव गंभीर जखमी झाला आहे, तर आरोपी अनिल ढमाले याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याच पुढे आले आहे.

Update: 2024-02-10 15:16 GMT

पुणे: आज सकाळी पुण्यातील औंध परिसरात पैशाच्या वादातून आकाश जाधव या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात आकाश जाधव गंभीर जखमी झाला आहे, तर आरोपी अनिल ढमाले याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याच पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अनिल ढमाले (वय ४५) असे आहे. आकाश जाधव आणि ढमाले यांच्यात पैशावरून वाद झाला होता. आकाश यांची सुवर्ण पेढी अनिल ढमाले त्यांच्याकडे भाड्याने होती. व्यावसायिक कारणाने ढमालेने आकाशकडून उसने पैसे घेतले होते. आकाश अनिलकडे सतत पैसे मागत असल्याने त्याने हा हल्ला केला आहे. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गोळीबारानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीने पोलिसांच्या ताब्यातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

या घटनेमुळे औंध परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags:    

Similar News