RBI पाठोपाठ ADB ही भारताबाबत 'बुलिश' , विकासदराचा अंदाज वाढला

After RBI, ADB is 'bullish' on India, growth rate forecast increased

Update: 2025-12-10 12:30 GMT

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत मागणी आणि उत्पादनातील वाढीच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याच पार्श्वभूमीवर, आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank - ADB) भारताच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या विकासदराचा (GDP Forecast) अंदाज वाढवला आहे.ADB ने आपल्या आधीच्या अंदाजात ७० बेसिस पॉईंट्सची वाढ करत आता भारताचा विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

ADB ने अंदाज का वाढवला ?

ADB ने आपल्या ताज्या 'एशियन इकॉनॉमिक आऊटलुक' (Asian Economic Outlook) अहवालात म्हटले आहे की, भारताने सलग दोन तिमाहींमध्ये (Quarter) अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. दुसरी तिमाही (Q2 - जुलै ते सप्टेंबर २०२५) या काळात भारताचा जीडीपी विकासदर ८.२% इतका राहिला, जो अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता.तर पहिल्या तिमाहीत हा दर ७.८% होता.

यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (First Half) भारताचा सरासरी विकासदर ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशांतर्गत वाढलेली खप (Domestic Consumption) आणि नुकतीच झालेली कर कपात (Tax Cuts) हे या वाढीचे प्रमुख कारण असल्याचे बँकेने म्हटले आहे.

वाढीची मुख्य कारणे (Growth Drivers)

ADB च्या मते, या मजबूत वाढीमागे खालील कारणे आहेत :

१. पुरवठा बाजू (Supply Side) उत्पादन (Manufacturing) आणि सेवा (Services) क्षेत्रात झालेली मोठी विस्तार.

२. मागणी बाजू (Demand Side)लोकांकडून वाढलेली मागणी आणि गुंतवणूक

३. निर्यात (Exports): अमेरिकेने टॅरिफ (आयात शुल्क) वाढवण्याची शक्यता असल्याने, भारतीय निर्यातदारांनी आधीच मोठ्या प्रमाणात माल पाठवल्याने (Frontloading) निर्यातीत वाढ झाली.

पुढील सहा महिन्यांत काय होईल ?

जरी सुरुवात दमदार झाली असली, तरी वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत (दुसऱ्या हाफमध्ये) वाढीचा वेग थोडा मंदावू शकतो, असा इशाराही ADB ने दिला आहे. याची कारणे खालीलप्रमाणे:

वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकार भांडवली खर्चात (Capital Spending) काही प्रमाणात कपात करू शकते.

अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफमुळे (US Tariffs) भारताच्या काही ठराविक निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती, जीएसटी दरातील कपात आणि कर्जाची वाढती मागणी (Credit Growth) यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळेल,असा दावा ADB ने केला आहे.

२०२६-२७ मध्ये भारताचा विकास दर किती ?

ADB ने पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) भारताचा विकासदर ६.५% राहण्याचा अंदाज कायम ठेवला आहे. कामगार कायद्यातील बदल (Labour Reforms), जीएसटीमधील सुलभता आणि निर्यातदारांना मिळणारी मदत यामुळे पुढील वर्षातही वाढीला चालना मिळेल, असे अहवालात नमूद केले आहे.

Tags:    

Similar News