आयआयटी बॉम्बे करणार स्टार्टअप्सना फंडिंग ! स्टार्टअप्सना मिळणार २५० कोटींचे पाठबळ

IIT Bombay will fund startups! Startups will get support of Rs 250 crores

Update: 2025-12-10 08:27 GMT

भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी आणि विशेषतः विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील प्रतिष्ठित संस्था 'आयआयटी बॉम्बे'ने (IIT Bombay) एक मोठे पाऊल उचलत स्वतःचा व्हेंचर कॅपिटल फंड (VC Fund) लाँच केला आहे. आयआयटी बॉम्बेच्या 'सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप' अर्थात SINE ने ९ डिसेंबर २०२५ रोजी 'Y-Point व्हेंचर कॅपिटल फंड' ची घोषणा केली. या फंडची एकूण साईज २५० कोटी रुपये इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या शैक्षणिक संस्थेशी संलग्न असलेल्या इन्क्यूबेटरने (Incubator) स्वतःचा व्हेंचर कॅपिटल फंड सुरू करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे.

हा फंड का महत्त्वाचा आहे ?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची गरज काय होती? तर, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), स्पेस टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स आणि बायोटेक यांसारख्या क्षेत्रांना 'डीप टेक' (Deep Tech) म्हटले जाते. अशा स्टार्टअप्सना संशोधन करण्यासाठी खूप वेळ लागतो (Long Development Cycles) आणि सुरुवातीला नफा मिळायला उशीर होतो. त्यामुळे अनेक खाजगी गुंतवणूकदार अशा कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात पैसे लावायला घाबरतात.

नेमकी हीच अडचण ओळखून, आयआयटी बॉम्बेचा हा 'Y-Point फंड' अशा स्टार्टअप्सना 'अर्ली स्टेज रिस्क कॅपिटल' (Risk Capital) पुरवणार आहे. म्हणजेच, आता कल्पनेला फक्त मेंटॉरशिप नाही, तर हक्काचे भांडवलही मिळणार आहे.

फायदा कुणाला होणार ?

या फंडचा थेट फायदा अशा संशोधकांना आणि युवा उद्योजकांना होईल जे आयआयटीच्या लॅबमध्ये किंवा रिसर्च नेटवर्कमध्ये काम करत आहेत. केवळ पैसेच नाही, तर या फंडद्वारे स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेशी जोडले जाईल.,बिझनेस ॲडव्हायझरी सपोर्ट मिळेल आणि प्रयोगशाळेतील कल्पनांचे रूपांतर मोठ्या व्यवसायात करण्यास मदत मिळेल. थोडक्यात सांगायचे तर, SINE च्या या निर्णयामुळे भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना आता जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे. लॅब टू मार्केट (Lab to Market) हा प्रवास आता अधिक सुखकर होईल.

Tags:    

Similar News