तुमचे १ लाख कोटी बँकांकडे 'बेवारस' ! मोदींनी सांगितला पैसा परत मिळवण्याचा सोपा मार्ग
Your 1 lakh crores are 'inherited' to the banks! Modi told an easy way to get your money back
बँका, म्युच्युअल फंड किंवा जुन्या विमा पॉलिसींमध्ये तुमचे किंवा तुमच्या पूर्वजांचे पैसे अडकले आहेत का? जर तुमचे उत्तर 'माहित नाही' असे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विविध आर्थिक संस्थांकडे पडून असलेली तब्बल १ लाख कोटी रुपयांची 'दावा न केलेली रक्कम' (Unclaimed Deposits) परत मिळवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासाठी त्यांनी 'तुमचा पैसा, तुमचा अधिकार' (Your Money, Your Right)अशी मोहिम सुरू केली आहे. विसरलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे रूपांतर नवीन संधीमध्ये करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
१ लाख कोटी रुपयांचे गणित काय ?
लिंक्डइनवर (LinkedIn) शेअर केलेल्या एका लेखात पंतप्रधान मोदींनी ही धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिकांचा कष्टाचा पैसा खालीलप्रमाणे पडून आहे:
बँका (Banks): ७८,००० कोटी रुपये
विमा कंपन्या (Insurance): १४,००० कोटी रुपये
लाभांश (Dividends):९,००० कोटी रुपये
म्युच्युअल फंड (Mutual Funds):३,००० कोटी रुपये
ही रक्कम म्हणजे असंख्य कष्टाळू कुटुंबांची बचत आणि गुंतवणूक आहे. हा पैसा तुमचा आहे आणि तो तुमच्याकडे परत यायलाच हवा,असेही मोदींनी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
https://www.linkedin.com/pulse/your-money-right-narendra-modi-bo19f
'तुमचा पैसा, तुमचा अधिकार' मोहीम नक्की काय आहे ?
केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी "आपकी पूंजी, आपका अधिकार" ही देशव्यापी मोहीम सुरू केली. बँका, शेअर्स, लाभांश आणि पेन्शनशी संबंधित दावा न केलेले पैसे मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
ही मोहीम '3A' सूत्रावर (Awareness, Accessibility, Action म्हणजेच जनजागृती, सुलभता आणि कृती) यावर आधारित आहे.
गेल्या २ महिन्यांत काय झाले ?
पंतप्रधानांनी माहिती दिली की, मागील दोन महिन्यांत देशातील ४७७ जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. सरकार, बँका आणि नियामक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आतापर्यंत २,००० कोटी रुपये मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
तुमचे पैसे कसे तपासायचे ?
पंतप्रधान मोदींनी नागरिकांना खालील ऑनलाईन पोर्टल्सचा वापर करून त्वरित आपले पैसे तपासण्याचे आवाहन केले आहे
१. बँकेतील ठेवींसाठी (RBI UDGAM Portal):तुमचा किंवा तुमच्या पालकांचा जुना बँक खाते आठवणीत नसेल, तर रिझर्व्ह बँकेच्या 'उद्गम' पोर्टलवर तपासा.
२. विम्याच्या पैशांसाठी (IRDAI Bima Bharosa):जुन्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी IRDAI चे 'विमा भरोसा' पोर्टल वापरा.
३. म्युच्युअल फंडासाठी (SEBI MITRA Portal):सेबीचे 'मित्र' पोर्टल तुम्हाला म्युच्युअल फंडातील दावा न केलेली रक्कम शोधण्यास मदत करेल.
४. शेअर्स आणि लाभांशासाठी (MCA IEPFA Portal):कंपन्यांचे शेअर्स किंवा डिव्हिडंड पडून असल्यास MCA IEPFA Portal वर तपासा.