मुख्यमंत्र्यांच्या सहीचा आदेश परस्पर फिरवला, मंत्रालयातील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्राच्या मंत्रालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला आदेश फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेल्या या आदेशात बदल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाच्या वर लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहिण्यात आला आहे. या मजकूरात संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करण्यात यावी असं म्हटलं आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कोणत्या व्यक्तीने अशा प्रकारे आदेश दिले आहेत. याची चौकशी व्हावी. या संदर्भात मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.