चला शपथविधीही उरकून घ्या - प्रा.हरी नरके

Update: 2019-05-21 03:57 GMT

प्राध्यापक हरी नरके यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत देशातील विविध वाहिन्यांनी दिलेल्या Exit Poll वर भाष्य केलं आहे. त्यांनी Exit poll च्या अंदाजावरुनच मोदींचा शपथविधी उरकून घ्या असा टोला लगावला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळणार असे नऊच्या नऊ एक्झिट पोल सांगत आहेत. त्यांचे पाहणी आणि विश्लेषण शास्त्रीय असल्याने ते १००% बरोबरच असणार.सर्वच चाचण्या परफेक्ट असतात. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ तफावत असते. त्यांनी किती मतदारांना विचारले? कोणता नमुना घेतला? किती घेतला? हे ते सांगत नाहीत. आपणही विचारू नये. एका चाचणीच्या मते मोदींना ३६५ जागा मिळतील. तर दुसरीच्या मते २४२ जागा मिळतील. दोघेही शास्त्रीय. त्यामुळे दोघातली तफावत अगदीच किरकोळ! ३६५ आणि २४२ जागा यात १२३ जागांचा फरक पडत असला तरी तो शून्य मानावा आणि २३ मे पर्यंत न थांबता लगे हात श्री मोदींचा शपथविधी उरकून घ्यावा.

मी तर म्हणतो यापुढे निवडणुकांवर खर्चही करण्याची गरज नाही. मतदारांचा चाचणी कौल घ्यावा आणि विजयी उमेदवार घोषित करावेत. किंवा मोदी-शहा यांच्या टिमला तहहयात विजयी घोषित करावे. हीच खरी लोकशाही. तर लोकशाहीचा विजय असो.

Similar News