नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा - मनमोहन सिंग

Update: 2019-05-05 14:09 GMT

आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धाडसी पाऊल समजला जाणारा नोटाबंदीचा निर्णय हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करत देशाला एका नव्या दमाच्या नेत्याची गरज असल्याचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर नोटाबंदीवरून जोरदार टीका केल्यानंतर विख्यात अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या काळात केलेल्या नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीचा निर्णय हा अतिशय धाडसी पाऊल असल्याचा उल्लेख करतात. तसंच या निर्णयामुळे काळ्यापैशाला आळा बसला असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येतो. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचं मनमोहन सिंह यांनी सांगितलं असून त्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजुनही सावरलेली नाही.

लोकांच्या मनात व्देष निर्माण करणं हा सरकारचा मंत्र

लोकांना बदल हवा आहे. देशाची जनता परिवर्तनाच्या तयारीत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा या सरकारचा मंत्र नाही तर लोकांच्या मनात व्देष निर्माण करणं हेच सरकारचं काम आहे. असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

Similar News