साखर कारखानदारांना अजित पवार यांचा सल्ला

Update: 2021-10-04 08:23 GMT

गुजरातप्रमाणे तीन टप्यात एफ आर पी दिल्यास शेतकऱ्याला सर्वात जास्त एफ आर पी देता येईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्याला एफ आर पी देण्यास उशीर करत आहेत. त्यात सर्वच कारखान्यांची एफ आर पी एकसारखी नाही, त्यामुळे गुजरातप्रमाणे तीन टप्यात एफ आर पी दिल्यास शेतकऱ्याच्या ऊसाला सर्वाधिक दर देता येणे शक्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यंदा एफ आर पी देताना उसाची आवक किती आहे हे पाहून शेतकऱ्याला एफ आर पी द्यावा आणि कारखान्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

Tags:    

Similar News