Municipal Corporation Elections 2026 : निवडणुकांचं बिगुल वाजलं, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी
अखेर सर्वांचं लक्ष असलेल्या राज्यातील Maharashtra Municipal Corporation Elections महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आज सोमवार (दि - 15 डिसेंबर 2025 ) Maharashtra State Election Commission राज्य निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर Election Schedule केला आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. 1442 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आजपासून निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असा असणार आहे, तर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तसेच 15 जानेवारी 2026 ला Voting Date मतदान होणार असून 26 जानेवारी 2026 ला निकाल Results Date लागणार असल्याचं राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे Dinesh Waghmare यांनी सांगितलं.
दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एकूण 3 कोटी 78 लाख मतदार आहेत. तसेच मुंबई महापालिकामध्ये ११ लाख पेक्षा जास्त दुबार मतदार आढळून आले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून Matadhikar App मताधिकार हे अॅप तयार करण्यात आलं आहे. ज्यांचं दुबार मतदान आहे, त्यांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलं आहे, ज्यांचं नाव दुबार असेल त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल असंही यावेळी आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तसेच मतदार यादितील दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.